जळगाव राजमुद्रा दर्पण। शहरातील सामाजिक, राजकीय ,क्रीडा, व शैक्षणिक क्षेत्रातील कार्यरत अल्पसंख्यांक समाजाततील कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन जिल्हाधिकारी जळगाव यांच्या मार्फत माननीय राष्ट्रपती व माननीय पंतप्रधान यांना निवेदन दिलेले आहेत.
१ )उत्तर प्रदेश शिया पर्सनल बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रजवी यांनी अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद यांच्या बाबत जे खोटे, असत्य व दिशाभूल करणारे पुस्तक प्रकाशित केले त्या पुस्तकावर बंदी व त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी २) सिनेसृष्टीतील तारका कंगना रणावत यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भारताला 1947 साली जे मिळाले ते स्वातंत्र्य नव्हे तर भीक होती भारताला खरे स्वतंत्र २०१४ साली मिळाले असे गैर वक्तव्य व स्वातंत्र्य सेनानी चा अपमान करणारे प्रतिक्रिया दिल्या बाबत संपूर्ण स्वातंत्र्य सेनानी यांचा आणि स्वातंत्र्यलढ्यात जीव देणारे यांचा अपमान झाला म्हणून तिला दिलेला पद्मश्री पुरस्कार काढून घ्यावा व तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. ३) त्रिपुरामध्ये अल्पसंख्यांक समाजावर व अल्पसंख्यांक समाजाच्या प्रार्थना स्थळावर झालेल्या हल्ल्याची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी करून दोषी व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात याव ४)मौलाना कलीम सिद्दिकी यांची त्वरित सुटका करण्यात यावी .
मानियार बिरादरीचे फारुक शेख, काँग्रेसचे तथा जमिअतचे मुफ्ती हारून नदवी, राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मझर पठाण, शिवसेना जळगाव शहर चे उप महानगरप्रमुख रईस शेख, राष्ट्रवादीचे सलीम इनामदार, हुसेनी सेना चे फिरोज शेख, एम आय एम चे उत्तर महाराष्ट्र विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सय्यद सनेर, मनपा जळगाव चे नगरसेवक प्रतिनिधी अक्रम देशमुख,महिला सेवा संघाच्या अध्यक्ष फिरोझा शेख व महासचिव नसरुन फातेमा पिरजादे, शनिपेठ अहीलेकार प्रतिष्ठानचे फारूक अहेलेकार, सिकलगर बिरादरीचे अन्वर खान ,पिंजारी बिरादरीचे रोशन पिंजारी, खाटीक बिरादरीचे याकूब खाटीक, शहा बिरादरीचे अश्फाक शाह, वरखेडी चे सरपंच मौलाना अरमान ,अला हिंद ट्रस्टचे अल्ताफ शेख व सलीम शेख, दिव्यांग संघटनेचे मुजाहिद खान, यासह नाजिम शेख ,अन्सार शेख, शेख रियाजुद्दीन, मोहसीन शाह , सय्यद सज्जाद, कमल हसन, सलमान शेख ,जावेद शेख, जफर अली सय्यद, मोहम्मद जमील, शेख अब्दुल गफार, सत्तार कच्ची आदींची उपस्थिती होती.