रावेल राजमुद्रा दर्पण । रावेर शहरातील स्टेशन रोड लगत शिक्षण संवर्धन संघातर्फे सरदार जी. जी. हायस्कूल व ज्युनियर कॉलेज तसेच सोके एस अग्रवाल कन्याशाळा चालविली जाते. गट नंबर ५२१ व ५२२ या शेतसारा माफियांच्या जागेवर पक्त शाळेच्या वापरासाठी परवानगी होती. परंतु संस्थेने या जागेचा अनधिकृत वापर करुन विना परवानगीने व्यापारी संकुल उभारल्याने शर्त भंग झाल्यामुळे फैजपूर विभागाचे प्रांतधिकारी कैलास कडलग यांनी रावेर शिक्षण संवर्धक संघाला सुमारे ७ लाख ४६ हजार ३६३ रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड भरण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिल्याने संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहे.
येथील नामांकित रावेर शिक्षण संवर्धक संघ संचालित विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय हे गट क्र. ५२१ व ५२२ च्या सुमारे ३२५६ चौरस मीटर क्षेत्रावर आहे भोगवटा वर्ग एक नुसार या क्षेत्राला शाळा वापरण्यासाठी परवानगी आहे. परंतु सारा माफियांच्या जागेवर शर्तभंग करून जागेचा अनधिकृत वापर करून व्यापारी संकुलन उभारण्याची तक्रार जीवन गांगवे रावेर यांनी ३० डिसेंबर २०१९ रोजी केली होती. या त्यावेळी रावेर तहसीलदारांनी फैजपूर प्रांत अधिकाऱ्यांकडे चौकशी अहवाल सादर केल्यानंतर या संस्थेला सात लाख ४६ हजार ३५६ रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. भरल्यानंतर वाणिज्य प्रभात रितसर महानगरपालिका नगर रचना विभाग यांचे ना हरकत दाखले १९५० पासूनचे सातबारा उतारे बिल शेतकरी परवाना तिचा आदेश क्षेत्राचा प्रामाणिक मोजणी नकाशा यांसह इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून वाणिज्य प्रयोग शेती वापर नियमित करून घेण्यासाठी कागदपत्रे सादर करावी. अन्यथा वापर बंद करून मृत वापरातील बांधकाम पाडण्याची कारवाई करण्यात येईल अधिकाऱ्यांनी पत्रात म्हटले आहे.