जामनेर राजमुद्रा दर्पण। समाजातील अज्ञान अंधकार दूर करून पत्रकारितेच्या माध्यमातून जनसेवा करणारे पत्रकार खऱ्या अर्थाने लोकशाहीचे चौथे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून संजय दादा गरुड आणि प्रदीप लोढा यांनी पहूर येथील कृषी पंडित मोहनलाल लोढा पतसंस्थेच्या सभागृहात पहूर येथील पत्रकार बांधवांचा यथोचित सत्कार केला. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना शांताराम लाठे यांनी सांगितले की स्वर्गीय नानासाहेब गरुड सर , नामदेवांना गरुड , कृषी पंडित मोहनलाल लोढा यांच्या दातृत्वाचा वसा आणि वारसा संजय दादा गरुड चालवत आहेत. आचार्य गजाननराव गरुड यांनी स्वाभिमानी राजकारण करून राज्यात नावलौकिक मिळवला. संस्थेचे अध्यक्ष बाबुराव पांढरी व संचालक मंडळ कर्मचारी वृंद यावेळी उपस्थित होते .सूत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा तालुकाध्यक्ष शैलेश पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन उपसरपंच श्याम सावळे यांनी केले.
यावेळी शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र घोलप ,उपाध्यक्ष किरण जाधव , सचिव शंकर भामेरे , सादिक शेख , शरद बेलपत्रे , गणेश पांढरे, मनोज जोशी, जयंत जोशी त्यांच्यासह सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.
पहुर शिवसेना शहर शाखेतर्फे शहरातील सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजीत पाटील शिवसेना प्रवक्ता तथा पत्रकार गणेश पांढरे शिवसेना उपतालुका प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य अशोक जाधव संजय तायडे रमेश शिरसागर युवासेना उपतालुका आमीन शेख आदी मान्यवरांनी सर्व पत्रकांचा सत्कार केला.