जळगाव राजमुद्रा दर्पण । त्रिपुरा राज्यात काही मशिदी पाडल्याच्या कथित घटनांच्या निषेधार्थ भिवंडी, मालेगाव, मनमाड, अमरावती, हिंगोली, नांदेड आणि सांगलीतील ईश्वरपूर (इस्लामपूर) इत्यादी ठिकाणी धर्मांधांनी 12 नोव्हेंबर या दिवशी नमाजानंतर मोर्चा काढण्यात आला. काही ठिकाणी धर्मांधांनी मोर्च्याच्या वेळी दुकाने फोडून, रस्त्यावरील वाहनांची हानी करून दंगलसदृश आणि दहशतीचेही वातावरण निर्माण केले. त्रिपुरामध्ये घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रात बंद पाळणे आणि मोर्चा काढणे, याचे कारण काय ? या प्रकरणाची माहिती देतांना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी हिंसक आंदोलन रझा अकादमीने केल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याचे सांगितले आहे. तरी राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवून अराजक स्थिती निर्माण करणार्या धर्मांधांवर कारवाई करण्याविषयी आणि त्यांना चिथावणी देणार्या रझा अकादमीवर बंदी घालावी, या मागणीसाठी जळगाव सह नांदेड, नाशिक, जालना, धुळे येथे स्थानिक प्रशासनास मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री यांच्या नावे निवेदन देण्यात आले. जळगाव येथे जिल्हाधिकारी यांच्या वतीने महसूल तहसीलदार पंकज लोखंडे यांनी निवेदन स्वीकारले.
निवेदनात या मागण्या आल्या
1. राज्यात ज्या ठिकाणी धर्मांधांनी मोर्चा काढून दडफेक करून दंगलसदृश्य वातावरण निर्माण केले, तेथील सर्व आयोजक आणि दोषी धर्मांधांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
2. उत्तर प्रदेशात दंगलखोरांकडून नुकसानभरपाई घेतली जाते, त्यांची मालमत्ता जप्त केली जाते, असा कायदा आहे, त्यानुसार राज्यातही कठोर कायदा करावा.
3. रझा अकादमीकडून आझाद मैदान दंगल प्रकरणातील नुकसानभरपाई अद्याप वसूल केलेली नाही, तरी त्यासह या घटनेची नुकसानभरपाईही तात्काळ करण्यात यावी आणि दंगलखोर रझा अकादमीवर तात्काळ बंदी घालण्यात यावी.