जामनेर राजमुद्रा दर्पण :- अभिनेत्री कंगना राणावतच्या बेताल वक्तव्यचा निषेध करीत.तिला मिळालेला पद्मश्री पुरस्कार शासनाने जमा करून कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.या मागणीसाठी जामनेर राष्ट्रवादीकडून महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राठोड यांना निवेदन देण्यात आले.कगंणाच्या या बेताल व अपरिपक्व विकसित मेंदूच्या स्रीने देशाच्या जवान, स्वातंत्र्य सैनिक,व स्वातंत्र्यासाठी फासावर गेलेल्या लढवय्यांचा घोर अपमान केला आहे.अशा या बेतालपणाच्या वक्तव्यामुळे देशाची प्रतिमा मलिन केली आहे.शासनाने कंगनाला दिलेला पद्मश्री पुरस्कार विनाविलंब परत घ्यावा. व देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.अशी मागणी निवेदनातुन केली आहे. अशोक चौधरी,छाया पाटील,कविता बोरसे,डॉ.प्रशांत पाटील, जितेश पाटील,किशोर पाटील,प्रल्हाद बोरसे,डॉ.बाजीराव पाटील,अहेफाज मुल्लाजी,युवराज पाटील,अजहर शेख,राजु शेख,निखिल निकम,कैफ शेख,अजहर सैय्यद,अहमद खान,मोहन चौधरी,दत्तात्रय नेरकर,प्रभु झाल्टे,विनोद माळी यांच्या निवेदना स्वाक्षरी आहेत.