दिल्ली राजमुद्रा दर्पण। कच्च्या तेलाचे दर घटल्याने जगभरामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होताना दिसत आहेत. कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने भारतात पेट्रोल,डिझेल काही प्रमाणात स्वस्त होईल अशी अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. भारतातील प्रमुख पेट्रोलियम कंपन्यांनी आपले दर स्थिर ठेवले आहेत. आज जाहीर करण्यात आलेल्या दरानुसार दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 103.97 तर डिझेल प्रति लिटर 86.67 रुपयांना मिळत आहे. कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या असतानाही भारतामध्ये पेट्रोल, डिझेलचे दर आहेत.
दरम्यान काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे भारतात पेट्रोल 10 रुपयांनी तर डिझेल 5 रुपयांनी स्वस्त झाले होते. त्यानंतर राज्य सरकारने देखील आपल्या राज्यात पेट्रोलचे दर कमी करावेत असे आवाहन केंद्राकडून करण्यात आले होते. केंद्राच्या या आवाहानाला प्रतिसाद देत अनेक राज्यांनी हॅटमध्ये कपात करत आपल्या राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचे दर काही प्रमाणात कमी केले.