अमळनेर राजमुद्रा दर्पण । गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. त्यामुळे प्रवासी, पेशंट, नोकरदार, लहान व्यापारी, विद्यार्थी यांची प्रचंड गैरसोय झाली आहे. शिक्षण उद्योग थांबले आहे. समाजाचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. एसटीला उत्पन्न मिळवून देण्यासाठी रक्ताचं पाणी करणारा कामगारवर्ग आपल्या न्याय हक्कासाठी शांततेच्या मार्गाने लढा देत आहे. त्यांचेही नुकसान होत असून महामंडळाचे उत्पन्नही थांबले आहे. यात शासनाने प्रतिष्ठेचा प्रश्न न करता सन्माननीय तोडगा काढावा. एसटी कर्मचाऱ्यांना न्याय, मागण्या मंजूर कराव्या संप मिटवावा व समाजाचे होणारे प्रचंड नुकसान थांबवावे ही मागणी विविध संघटनांच्या माध्यमातून केली जात आहे.