मुंबई राजमुद्रा दर्पण। अजय देवगण स्टार ‘ सिंघम 3’ चित्रपटात दिसणार आहे. मात्र या चित्रपटासाठी प्रेक्षकांना बरीच वाट पहावी लागणार आहे. ‘सिंघम 3’ ची शूटिंग 2022 अखेरपर्यंत सुरु होऊ शकत नाही. रोहितने त्याची लेटेस्ट फिल्म ‘सूर्यवंशी’ च्या शेवटी अजय देवगण स्टारर सिंघम फ्रेंचायझीच्या तिसऱ्या पार्टची हिंट दिली होती. पोलीस अॅक्शन ड्रामा ‘सिंघम 3’ बाबत प्रेक्षकांना असलेली उत्सुकता कळतेय. मात्र 2022 अखेर पर्यंत चित्रपट सुरु होऊ शकत नाही, असे दिग्दर्शक रोहित शेट्टीने स्पष्ट केले.
जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवण्याच्या पार्श्वभूमीवर रोहित चित्रपट बनवणार असल्याची चर्चा आहे. वर्ष 2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवण्यात आले होते आणि जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देण्यात आला. रोहित शेट्टीला याबाबत विचारले असता, मी ही प्रेक्षकांमध्ये सुरु असलेल्या चर्चेबाबत ऐकले आहे. मात्र मलाच याबाबत माहित नाही. केवळ प्रेक्षक बोलत आहेत. कोणत्याही बिग बजेट चित्रपटाबाबत असे होते. लोक आपली कथा लिहितात, असे त्याने सांगितले.
कोरोना महामारीमुळे अजय देवगणकडे आधीच एक बॅकलॉग आहे. त्यामुळे आम्ही पुढच्या वर्षाच्या अखेरपर्यंत चित्रपटाची शूटिंग सुरु करु शकत नाही. सूर्यवंशीच्या एक्साइटमेंटमुळे प्रेक्षकांना सिंघम चित्रपटाची प्रतिक्षा आहे. मात्र तांत्रिकदृष्ट्या आम्ही 2023 पर्यंत चित्रपट रिलिज करु शकत नाही.