मुंबई राजमुद्रा दर्पण । एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि काशिफ खान यांचे काय संबंध आहेत? काशिफ खानच्या विरोधात पुरावे देऊनही त्याला अटक का केली जात नाही? या प्रकरणातील व्हाईट दुबई कोण आहे? त्यालाही अटक का केली जात नाही?, असे सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले आहेत.
काशिफ खान हा गोव्यात लपून बसला आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे झोनल डायरेक्टर असताना त्यांच्याकडे गोव्याचा चार्ज होता. गोव्यात ड्रग्ज टुरिझम चालतं हे जगभरातील लोकांना माहीत आहे. रशियन माफीया हे ड्रग्जचं रॅकेट चालवतात. पण गोव्यात कोणतीही कारवाई होत नाही. कारण काशिफ खानकडून गोव्यात हे रॅकेट चालवलं जातं. काशिफ खान आणि वानखेडेंचे घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे काशिफवर कारवाई होत नाही. तुम्ही काशिफ खानला का बोलवत नाही? व्हाईट दुबईला का अटक झाली नाही? अशी माझी तुम्हाला विचारणा आहे, असं मलिक म्हणाले.
काशीफवर देशभरात गुन्हे आहेत. चार दिवसांपूर्वी त्याच्यावर फसवणुकीची गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला का वाचवलं जात आहे हे सांगावं. एका कोर्टाने त्याला फरार घोषित केलं आहे. तरीही त्याला का वाचवलं जात आहे? असा सवालही त्यांनी केला.