धुळे राजमुद्रा दर्पण । धुळे शहरात बनावट दारू तयार केली जात आहे व ठिकठिकाणी दारूचा पुरवठा केला जात आहे. याबाबत धुळे शहर पोलिसांना माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी बनावट दारुचा कारखाना उद्ध्वस्त करीत चौघांच्या ताब्यात घेतले आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून धुळे शहरातील प्लॉट नंबर १३ सुरतवाला बिल्डिंगमध्ये या घरात छापा टाकून बनावट दारुचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला. या कारवाई दरम्यान दोन महिला व दोन पुरुषांना धुळे शहर पोलिसांनी रंगेहात अटक केली असून या घटनेचा मुख्य सूत्रधार घटनास्थळावरून पसार झाला आहे. परंतु त्याचा देखील शोध धुळे शहर पोलिस घेत आहे. कारवाई दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून २२ दारूचे खोके, १०५ लिटर स्पिरिट, दोन मोटारसायकली, १२० लिटर सुट्टी दारू असा जवळपास ३ लाख २७ हजार २८६ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.