जळगाव राजमुद्रा दर्पण । जळगाव शहरातील ऑटो रिक्षांना मीटर बसवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतरही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून कार्यवाही करण्यात आली नाही. त्याचप्रमाणे रिक्षामध्ये मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी बसवून नियमांचे उल्लंघन करण्यात येत असल्याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी पालकमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.
ऑटो रिक्षांना मीटर नसल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्याबाबत त्यांनी कार्यवाही करण्याचे आदेश परिवहन विभागाला दिले होते. अद्याप परिवहन विभागाने याबाबत ठोस कार्यवाही केलेली नाही. जळगाव शहरात 95 टक्के रिक्षांचे फेअरिंग मीटर सुरू नाहीत. दिखाव्यासाठी मीटरचा ढाचा लावण्यात आलेला आहे. नवीन रिक्षा मध्ये पासिंगच्या वेळेस मीटर लावण्यात येत आहेत. नंतर मिटर काढून टाकण्यात येत आहे दुसरा रिक्षांच्या पासिंग च्या वेळेस त्यांचा पुन्हा वापर करण्यात येतो. विषयाच्या लोक प्रवाशांकडून मनमानी प्रमाणे भाडे वसूल करीत आहेत. परिवहन विभागाने रिक्षा मीटर चे भाडे प्रतिकिलोमीटर ११ रुपये केले आहेत. त्याप्रमाणे भाडे आकारले जात नाही त्या अनुषंगाने प्रादेशिक परिवहन विभागाकडून जिल्ह्यात जिल्ह्यात महिन्याभरात रिक्षाचालकांची तपासणी मोहीम राबविण्यात यावेत अशी रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गुप्ता यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.