अमळनेर राजमुद्रा दर्पण । खोटं सिद्ध झाल्याचा राग आल्याने बापानेच मुलाच्या पाठीवर, डोक्यावर विळ्याने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना दि. १४ रोजी रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सानेनगर भागात घडली.
दरम्यान, सानेनगरमधील प्रकाश पाटील यांनी त्यांचा भाऊ शिवाजी पाटील यांना फोन करून आई आजारी आहे. तू लवकर ये, म्हणून फोन केला. शिवाजी पाटील यांनी खरंच आईची तब्बेत बिघडली आहे का? हे पडताळण्यासाठी पुतण्या रोहित पाटील याला विचारले असता, रोहितने त्याचे वडील खोटे बोलत असून, आजीची तब्येत चांगली आहे, म्हणून काकांचे आजीशी बोलणे करून दिले. वडिलांचे खोटे बोलणे उघडकीस आल्याने त्यांना राग आला. त्यांनी रोहित पाणी भरत असताना, अचानक त्याच्या पाठीवर विळ्याने वार केला. तो त्याच्या कानाजवळ लागला आणि तो खाली पडू लागताच प्रकाश पाटील याने पुन्हा मारण्यासाठी धावले. आई, बहीण यांनी भांडण आवरले आणि रोहितच्या चुलत भावाने त्याला धुळे येथे खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रोहितने दवाखान्यातूनच जबाब दिल्याने प्रकाश पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, एएसआय रामकृष्ण कुमावत तपास करीत आहेत.