सिंधुदुर्ग राजमुद्रा दर्पण। नारायण राणे आज कोकणात होते. सिंधुदुर्गातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी या बैठकीवरून ठाकरे सरकारवर घणाघाती हल्ला केला. राज्यात अनेक प्रश्न आहेत. तरीही या सरकारला त्याचं काही पडलं नाही. हे सरकार अधिवेशन घेण्याच्या मानसिकतेत नाही. हे आजारी सरकार आहे. आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार आहे, अशी टीका राणेंनी केली.
महाराष्ट्रातील काही भागात दंगली उसळल्या होत्या. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्र धगधगतोय त्याचं खापर भाजपवर फोडण्याचं कारण नाही. दंगलीला कोण कारणीभूत आहे आणि या सर्व गोष्टींकडे सरकार काय दृष्टीने पाहते हे सर्वांना माहीत आहे. राज्यात अशांतता राहू नये म्हणून आमचे नेते प्रयत्न करत आहेत, असं त्यांनी सांगितलं.
विकासाच्या कामात मला खोडा घालायचा नाही. मी या विषयावर कधी बोललो नाही. आजही बोललो नाही. विकासाच्या कामात मी कधीही खोडा घालत नाही. आधी मेडिकल कॉलेजला ज्या गोष्टी लागतात त्या पुरवा आणि मग बोला, असा गंभीर आरोप राणेंनी केला.