दिल्ली राजमुद्रा दर्पण । देशाची राजधानी दिल्लीमध्ये भर रस्त्यात एका कॅब चालकाला महिलेने मारहाण केली आहे. वेस्ट पटेल नगरमधील एका रस्त्यावर ही घटना घडली. ही महिला कॅब चालकाची कॉलर पकडून त्याच्या कानशिलात लगावली आहे.
निळ्या रंगाचा टीशर्ट आणि तोंडावर मास्क असलेली महिला कॅब चालकाला रस्त्यात कॉलर पकडून मारहाण करण्यात आली आहे. घटनेवेळी आजूबाजूला लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात जमली होती. या महिलेबरोबर अन्य एक महिला आहे. गर्दीत काही लोक या महिलेला दोषी ठरवत असल्याचे या व्हिडिओमध्ये ऐकायला आणि बघायला मिळत आहे. ही घटना वेस्ट पटेल नगरच्या कस्तुरी लाल आनंद मार्गावर ब्लॉक २२ मधील असल्याचे सांगितले जात आहे.
महिला एका अन्य तरुणीबरोबर दुचाकीवरून जात होती. रस्त्यावर गर्दी असल्यामुळे कॅब तिथे अडकली होती. दुचाकीला वाट न दिल्याच्या राग मनात भरत महिलेने दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली होती. त्यानंतर शिवीगाळ करत कॅबजवळ गेली. चालकाला खेचून बाहेर काढले आणि त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली आहे. काही लोकांनी या महिलेला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना देखील अपशब्द वापरले आहे. मारहाण होत असताना कॅब चालक शांतपणे उभा होता. त्याने कोणतेही प्रत्युत्तर दिले नाही.
व्हिडिओमध्ये कॅब चालकाला मारहाण करताना दिसणाऱ्या महिलेच्या दुचाकीच्या क्रमांकावरून तिचा पत्ता शोधण्याचे काम चालू आहे. हा व्हायरल व्हिडिओ आठवडा अगोदरचा आहे. कॅब चालक हा फरीदाबादचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.