मुंबई राजमुद्रा दर्पण । विलिनीकरणासाठी नेमलेली समिती आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांमध्ये झालेल्या बैठकीमध्ये कोणताही तोडगा निघालेला नाही. दरम्यान, आणखी काही बस सुरु झाल्याचा दावा एसटी महामंडळाकडून करण्यात आला आहे. तर दुसरीकडे रोजंदारीवर एसटी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजवण्यात आली आहे.
यानुसार २४ तासांत कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य सरकारमध्ये विलिनीकरण झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याची भूमिका एसटी कर्मचारी संघटनांनी या बैठकीमध्ये घेतले आहे. दुसरीकडे संप मागे घेण्याचे आवाहन परत एकदा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे. २४ तासामध्ये कामावर हजर न झाल्यास सेवा समाप्तीची कारवाई होणार आहे, असा इशारा देण्यात आला आहे. ३५० रोजंदारीवर कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. २४ तासांत कामावर हजर न झाल्यास सेवा समाप्तीची कारवाई करण्यात येणार आहे, असे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.