जळगाव राजमुद्रा दर्पणन । वीजबीलांची थकबाकी न भरल्याने जळगाव, धुळे नंदुरबार जिल्ह्यातील एकूण ५६ हजार २६९ वीजग्राहकांचे कनेक्शन कापण्यात आले आहे. महावितरणकडून वीज बील वसुलीसाठी कनेक्शन तोडण्याची मोहीम राबवण्यात जात आहे.
दिवाळीनंतर या मोहिमेला वेग आला असून, या कामा विषयी अभियंत्यांना उद्दीष्टे देण्यात आली आहे. या थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे ग्राहकांनी वीज बिल भरले नाही तर वीजपुरवठा खंडित करण्याशिवाय महावितरणसमोर कोणताच पर्याय उरलेला नाही असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. प्रचंड वाढलेल्या थकबाकीमुळे आता यापुढे थकबाकी वसूल करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना मोहिमा राबवण्याचे निर्देश महावितरणने दिले असून, थकबाकी वसुलीत कसूर करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाईचे संकेतही दिले आहे.