धुळे राजमुद्रा दर्पण । जिल्हा विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे आमदार अमरीश पटेल यांचं नाव निश्चीत करण्यात आलेल आहे. मात्र पटेल यांच्या विरोधात कोणास उमेदवारी मिळणार हे समजू शकले नाही. विधानपरीषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत २३ नोव्हेंबर आहे. धुळे व नंदुरबार जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या जागेसाठी १० डिसेंबरला मतदान होणार आहे. यासंदर्भात अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू झाली. पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपच्या महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक झाली.
मुंबई येथे झालेल्या बैठकीत बैठकीत धुळे- नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या जागेसाठी विद्यमान आमदार अमरीश पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. गेल्या वर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे 199 सदस्य असताना आमदार पटेल यांना तब्बल 332 मते मिळाली होती. शिरपूर नगरपालिकेत काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी भाजपचे आमदार अमरीश पटेल यांना मतदान केले होते. पण काँग्रेसकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती. आमदार पटेल यांच्या विरोधात कोण उमेदवारी करतो; याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विरोधकांकडून अद्याप अधिकृत भूमिका जाहीर झालेली नाही. येत्या चार दिवसांत विरोधकांकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.