जळगाव राजमुद्रा दर्पण | राष्ट्रवादीमध्ये कार्यकर्त्यांपेक्षा नेतेच जास्त हा प्रत्यय नेहमी येत असतो त्याप्रमाणेच संघटनात्मक कलह अनेकवेळा राष्ट्रवादी मधून उफाळून आला आहे आता देखील जिल्हा बँक निवडणुकीचे यश राष्ट्रवादी च्या उंबरठ्यावर असताना मात्र गंभीर राजकारण शिरले आहे. जो पक्ष विरोधी कार्य करेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी दिला असताना राष्ट्रवादीचे पदाधिकारी विकास पवार यांनी यांनी मात्र शेतकरी पॅनेलच्या माध्यमातून वेगळी चूल जिल्हा बँकेत मांडली आहे. यामुळे पक्षाचे धुरंदर नेतृत्व असणारे माजी मंत्री सतीश अण्णा पाटील ज्यांच्या समोर राजकीय आव्हान उभे टाकले गेले आहे.
या दरम्यान जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील व विकास पवार यांच्या नात्यासंबंधी राष्ट्रवादीतील सोशल मीडिया ग्रुप वर ऊहापोह करण्यात येत आहे. जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील व विकास पवार हे जवळचे सगळे संबंधी असल्याचे त्या फायनल पोस्टमध्ये म्हटले गेले आहे म्हणूनच त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. माजी मंत्री सतीश पाटील यांना पाडण्यासाठी विकास पवार यांची उमेदवारी देण्यात आल्याचा गंभीर गौप्यस्फोट सोशल मीडियावर व्हायरल पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
विकास पवार यांच्यामुळे जिल्हा बँक निवडणूक मध्ये राष्ट्रवादी पक्ष अडचणीत आला आहे असे असताना जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांनी विकास पवार यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी सोशल मिडीयावर राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्यांनी केल्याने पक्षातील अंतर्गत कलह जिल्हा बँक निवडणुकी निमित्ताने उफाळून आला आहे. सतीश आण्णा पाटील यांना पाडण्यासाठी कार्यक्रम लावल्याचे दिसून येत आहे. असे या पोस्टमध्ये म्हटले गेले आहे. सतीश पाटील हेच जिल्हा बँकेचे चेअरमन होऊ शकता म्हणून त्यांना पाडण्यासाठी हा कट रचला गेल्याचा गौप्यस्फोट सोशल मीडियावर त्या व्हायरल पोष्ट मधून करण्यात आला आहे.
विकास पवार सतीश पाटील यांना पाठिंबा देत नसतील तर त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी देखील करण्यात आले आहे. एका प्रसार वृत्तवाहिनीला जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांनी पक्षाची गद्दारी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया दिली होती. त्याप्रमाणे विकास पवार यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी या दरम्यान करण्यात आली आहे.
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चे प्रकरण प्रदेशाध्यक्ष जयंत राव पाटील तसेच जळगाव जिल्हा संपर्कमंत्री अजित दादा पवार यांच्यापर्यंत गेले नसेल का ? अथवा त्यांना माहिती नसेल का ? असा देखील विरोधीक आक्षेप घेण्यात आला आहे.
राष्ट्रवादीमध्ये अनेक गटातटाचे राजकारण आहे. यामध्ये अनेक नेत्यांची गट-तट आहे. प्रत्येक जण आपल्या नेत्याची हुजरेगिरी करताना दिसून येत आहे. मात्र संघटनात्मक दृष्ट्या पक्षवाढीसाठी कार्य करणाऱ्या नेतेमंडळींचा अभाव या घटनाक्रमातून दिसून येत आहे. पक्षांतर्गत वाद थेट सोशल मीडियावर सुरू झाल्याने आणखी वादाला फोडणी देण्यात दिली जात आहे.
विकास पवार यांनी जिल्हा बँकेत संधी दिली गेली नसल्याने नाराजी व्यक्त केली होती. मात्र शेतकरी पॅनल च्या माध्यमातून मी उमेदवारी करीत असल्याचे त्यांनी जाहीर पत्रकार परिषदेत म्हटले होते. प्रत्येक वेळी पहिल्या फळीतील नेतेच ठीक-ठिकाणी पदे मिळत असतात, मात्र दुसऱ्या फळतील नेते व कार्यकर्त्यांना उपेक्षित ठेवले जाते असा आरोप त्यांनी राष्ट्रवादीतील नेत्यांवर केला होता. या आरोपानंतर जिल्हाभरात जिल्हा बँकेत निवडून आलेल्या नेत्यांवर त्यांनी आक्षेप नोंदवला होता.