जळगाव राजमुद्रा दर्पण । कार्तिकी एकादशीनिमित्त श्रीराम मंदिर संस्थानतर्फे दरवर्षाप्रमाणे रथोत्सवाचे आयोजन करण्यात आहे होते. जळगावचे ग्रामदैवत प्रभू श्रीराम रथोउत्सवा निमित्त १५ नोव्हेंबर सोमवार रोजी राजमुद्रा चा “रथोउत्सव विशेष अंक” जुने जळगाव येथील श्रीराम मंदिरात प्रकाशन करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, महापौर जयश्री महाजन, आमदार राजू मामा भोळे, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, आमदार चंदूलाल पटेल, उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी महापौर भारती सोनवणे, माजी महापौर सीमा भोळे, नगरसेविका शुचिता हाडा, नगरसेविका राणे, नगरसेवक विष्णू भंगाळे, नगरसेवक विरण खडके, अमित जगताप आदी उपस्थित होते.