मुंबई राजमुद्रा दर्पण । पवईच्या साकी विहार रोडवर ह्युंदाई सर्व्हिस सेंटर कंपनीला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण आगीत कर्मचारी अडकल्याची माहीती मिळत आहे. तर आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न अग्निशमन दलाचे जवान करत आहेत. गँस सिलेंडरचा स्फोट होवून आग लागल्याचे कर्मचारी सांगत असून आग लागली आहे. तेव्हा मोठा प्रमाणात आवाज या ठिकाणी येत आहेत. दरम्यान आग ही पसरत असून आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहे.
पवईतील साकी विहार रोडवर एल अँड टी कंपनीच्या समोर साई ऑटो हुंडाईचं सर्व्हिस सेंटर आहे. या सेंटरला भीषण आग लागली आहे. पवई पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि वाहतूक विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीमुळे आणि नागरिकांच्या प्रचंड गर्दीमुळे वाहतूक कोंडी होऊन मदत कार्याला उशीर होत आहे. या आगीमध्ये कोट्यवधींचे गाड्या असून त्या जळून खाक झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.