जामनेर राजमुद्रा दर्पण । शासकीय रुग्णालयात कुटुंब नियोजनाचे कामकाज बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांना याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. १० ते १२ हजार रूपये एवढा खर्च खाजगी दवाखान्यात द्यावा लागत होता. आता तालुक्यातील सर्वच शासकीय रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया नेहमी प्रमाणे सुरू झाल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमधुन समाधान व्यक्त केले जात असुन. डॉ.प्रशांत महाजन यांनी सेवाभावी वृत्ती जोपासत ग्रामीण भागात जाऊन तळागाळातील नागरिकांना सेवा देत.
फत्तेपुर, गारखेडा, वाकडी येथे एकाच दिवशी ४३ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्या. तालुक्यात यापुढेही ग्रामीण भागात अधिकाधिक कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणार असल्याचे मानस डॉ.प्रशांत महाजन यांनी व्यक्त केले. ज्या लाभार्थींना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करायच्या आहेत त्यांनी आपल्या भागातील आशा, आरोग्य सेविका, स्टाफ नर्स तसेच शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा असे आवाहन तालुका आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे सुद्धा लवकरच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीर दर आठवड्याला सुरू करण्यात येतील. तसेच ग्रामीण रुग्णालय पहुर येथे लेप्रोस्कोपीक कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया तसेच पुर्व नियोजित सिझर मोफत करण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांनी दिली.