जळगाव राजमुद्रा दर्पण । बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. आणि चाइल्ड पोर्नोग्राफीचा ऑनलाइन वाढता गोरखधंदा पाहता सीबीआयच्या विविध पथकांतर्फे देशातील १४ राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांत सुमारे ७७ ठिकाणी एकाच दिवशी छापे टाकले. यात ८३ आरोपींविरुद्ध २३ गुन्हे दाखल करण्यात आले. या छाप्प्यात महाराष्ट्रातील जळगाव-धुळे जिल्ह्यांचा समावेश असल्याचे सीबीआयच्या अधिकृत प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
सीबीआयच्या पथकाला ओडिशात विरोध झाला. हे छापे दुसर्या दिवशी बुधवारीदेखील सुरूच होते. आदल्या दिवशी मंगळवारी (ता.१६) टाकलेल्या छाप्यांत ताब्यात घेतलेल्या संशयितांच्या चौकशीत ठोस पुरावे आढळून आल्यावर संशयितांवर अटकेची कारवाई होईल. चाइल्ड पोनोग्राफी या अश्लील वेबसाईट आणि अल्पवयीन मुलांच्या लैंगिक शोषणप्रकरणी विदेशी नागरिकांच्या धरपकडीसह त्यांचा सहभाग असण्याचे संकेत यापूर्वीच इंटरपोलद्वारे देण्यात आल्याने संबंधित देशांशी संशयितांच्या प्रत्यार्पणासंदर्भात लवकरच संपर्क करणार आहे.
सीबीआयने या प्रकरणी एक विशेष टीम बनवली आहे. अशा प्रकरणांवर ही टीम नरज ठेवून आहे. अशा प्रकरणांचा खोलात जावून तपास सुरू आहे. असे जवळपास ५० हून अधिक ग्रुप आहेत. ५००० हून अधिक लोक त्यांच्याशी जुडलेले आहेत. त्यांचे संबंध १०० देशांशी आहेत. या प्रकरणांत ८० हून अधिक लोक सहभागी असल्याचं सीबीआयला तपासात आढळून आलं. छाप्यांदरम्यान अनेक इलेक्ट्रॉनिक डिवाइस, मोबाइल, लॅपटॉप जप्त करण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिल्याचे सांगितले जात आहे.