जळगाव राजमुद्रा दर्पण । माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या घरकुल प्रकरणातील शिक्षेवरील स्थगितीबाबत दाखल याचिकेच्या सुनवाईसाठी पुढील तारीख २२ नोव्हेंबर देण्यात आली. तर जिल्हा बँकेसाठी २१ तारखेला मतदान आहे. त्यामुळे एकप्रकारे देवकरांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. सामाजिक कार्यकर्ते पवन ठाकूर यांनी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या शिक्षेवरील स्थगिती उठविण्याबाबत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर १५ नोव्हेंबर रोजी सुनावणी पूर्ण झाली होती. आज न्यायालयाने काम झाल्यानंतर पुढील दाखल याचिकेच्या सुनवाईसाठी २२ नोव्हेंबरची तारीख दिली आहे.
दुसरीकडे जिल्हा बँकेसाठी २१ तारखेला मतदान आहे. तर मतमोजणी २२ तारखेला आहे. ते महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलतर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, बँकेच्या चेअरमनपदासाठी त्यांचा दावा मजबूत मानला जात आहे. यातच आता सुप्रीम कोर्टाने दिलासा दिल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाल्याचे दिसून येत आहे.