जळगाव राजमुद्रा दर्पण । भारतीय राष्ट्रीय प्राधिकरण तर्फे आकाशवाणी चौक, ईच्छा देवी चौक व अजिंठा चौफुली येथे सर्कलचे काम सुरू करण्यात आलेले होते. जळगाव शहरातील वाढती वाहतूक लक्षात घेता याठिकाणी होणाऱ्या सर्कलच्या कामामुळे वाहतुकीस अडथळा होऊन लहान मोठे अपघात होऊन जिवीत हानी होण्याची शक्यता लक्षात आल्याने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगरतर्फे दिनांक 12 नोव्हेंबर 2021 रोजी उपरोक्त नमुद तिन्ही चौकात सर्कल होऊ नये व उड्डाणपुल बांधण्यात यावे, यामागणीचे निवेदन मा. जिल्हाधिकारी, जळगाव व मा. प्रकल्प अभियंता, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, जळगाव यांना देण्यात आले होते. परंतु 5/6 दिवस उलटुन देखील सदर निवेदनाची दखल न घेतल्याने , आज रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगर तर्फे महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांसाठी अत्यंत गैरसोयीचे व जीवघेणे ठरणारे आकाशवाणी चौकातील सर्कलचे निकृष्ठ बांधकाम आंदोलन करून बंद करण्यात आले .
आंदोलन स्थळी जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे साहेब , रामानंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे साहेब व जळगाव शहर वाहतूक शाखा चे पोलीस निरीक्षक कानडे साहेब या अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी व भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अधिकारी यांच्यात समन्वय घडवुन आणण्याचा प्रयत्न केला. परंतु आंदोलक हे त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याने चर्चेतून जनहिताचा मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनि चर्चा करण्यासाठी बोलवले आहे असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. जिल्हाधिकारी अभिजितजी राऊत साहेब यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांशी आंदोलकांच्या मागणीप्रमाणे आकाशवाणी चौक, ईच्छादेवी चौक व अजिंठा चौफुली येथे उड्डाणपुल बांधणेकामी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याबाबत आश्वस्त केले. पोलीस अधीक्षक प्रवीणजी मुंढे साहेब यांनी सर्कलचे काम सुरू असल्याने जास्त जागा व्यापली आहे म्हणून नागरिकांना ट्रॅफिकचा त्रास होत आहे पण सर्कल पूर्ण झाल्या नंतर नागरिकांना जास्त जागा वापरासाठी मिळेल व ट्रॅफिकची समस्या होणार नाही . असे भारतीय राष्ट्रीय राजमार्गाच्या अधिकाऱ्यांचे मत असल्याचे सांगितले. पण सर्कलचे काम पूर्ण होऊन देखील जर नागरिकांना गैरसोयीचे वाटत असेल तर निश्चितच सर्कलचा व्यास कमी करण्यात येईल.
सदर आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अशोक लाडवंजारी, सुनील माळी, मंगला पाटिल, नामदेवराव चौधरी, रवींद्र नाना पाटिल, अमोल कोल्हे, विनोद देशमुख, सुशील शिंदे , किरण राजपूत, राजू मोरे, अशोक सोनवणे, जितेंद्र बागरे, भगवान सोनवणे, नाईम खाटिक, डॉ. रिजवान खाटिक, राहुल टोके, रमेश बहारे, मुविकोराज कोल्हे, मनोज वाणी, सुदाम पाटिल आदि कार्यकर्ते उपस्थित होते .