भंडारा राजमुद्रा दर्पण । खाेटे बाेलणे हे पंतप्रधान नरेंद्र माेदींचे आणि भाजपचे हे सर्वांत महत्वाचे कार्य आहे. हे पुढच्या काळात चालणार नाही. त्यामुळे देशातील शेतक-यांची पंतप्रधान नरेंद्र माेदींनी माफी मागावी. असे काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी म्हटले आहे.
नाना पटाेले म्हणाले माेदी सरकारचे शेतकरी विराेधी धरणातील लपलेला विषय अद्याप पुढे आलेला नाही. पाच राज्यातील निवडणुकीवर डाेळा ठेऊन हा कायदा मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रपती पदाची निवडणुक डाेळ्यासमाेर ठेऊन आमदार कमी झाले नाही पाहिजेत याची काळजी माेदींनी घेतली आहे. त्यामुळेच आजचा हा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. शेतक-यांचे आंदाेलनात लखीमपूरला मंत्र्यांच्या मुलाने शेतक-यास मारल्याची घटना आजही ताजी आहे. परंतु उत्तर प्रदेशातील मंत्री आजही माेदी सरकारमध्ये कायम आहे. त्यामुळे ही तात्पूरती व्यवस्था आहे. खाेटे बाेलणे हे माेदींचे आणि भाजपचे हे सर्वांत महत्वाचे कार्य आहे. हे पुढच्या काळात चालणार नाही. त्यामुळे देशातील शेतक-यांची पंतप्रधान नरेंद्र माेदींनी माफी मागावी. शेतकरीविरोधी तीन काळे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पंतप्रधान मोदींनी ‘आंदोलनजीवी’ म्हणत हिणवलं होतं. आज काळे कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा अहंकारी मोदी सरकारला करावी लागली. हा ‘आंदोलनजीवी शेतकऱ्यांचा’ विजय असल्याची भावना नाना पटाेले यांनी व्यक्त केली.