जळगाव राजमुद्रा दर्पण । राज्य नाट्य स्पर्धेतील प्रवेशिका भरण्याची अंतिम मुदत वाढवावी तसेच जास्तीत जास्त संघाचा सहभाग वाढेल याकरिता स्पर्धा सुरू होण्याची तारीख सुद्धा वाढवावी अशी मागणी नाट्यकलावंतातर्फे करण्यात आली.
नाट्याची मांदियाळी म्हणजेच महाराष्ट्र हौशी राज्य नाट्य स्पर्धा असते. तो आनंद आपल्या या निर्णयाने सर्व नाट्यकलावंत व प्रेक्षकांना मिळणार आहे. या स्पर्धेचे सूचना काल परवाच मिळाली, या स्पर्धेची प्रवेशिका भरण्याची मुदत ३० नोव्हेंबर २०२१ अंतिम आहे. ती वाढवून ३० डिसेंबर करावी. यामुळे जास्तीत जास्त संघाचा सहभाग वाढेल. तसेच स्पर्धा होण्याची तारीख १ जानेवारी २०२२ आहे.ती १ फेब्रुवारी २०२२ करावी. त्यामुळे तालमीस योग्य वेळ मिळेल. यामुळे स्पर्धा दर्जेदार होईल. तसेच स्पर्धेचे तीन परीक्षक असतात त्यापैकी दोन परीक्षक हे थिएटर आर्ट चे पोस्ट ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे. असा नियम देखील करावा.
यामुळे उत्कृष्ट अभ्यास असलेले व जागतिक नाटकांचे व भारतीय नाटकांचे भान असलेले परीक्षक नाट्य रंग भूमीला लाभतील. कारण दहा वर्षावर झाले आहे. महाराष्ट्रात महत्वाच्या सगळ्या विद्यापीठात पदवी व पदवी उत्तर अभ्यासक्रम शिकवला जात आहे. म्हणून शेकडो नाट्य सुशिक्षत नवीन पिढीचे लोक उपलब्ध आहेत. त्यांच्या ज्ञानाचा सुयोग्य उपयोग होईल व त्यांना कामाची संधी मिळावी यासाठी जाहिरातीतून जाहीर आव्हान जे कोणी थिएटर आर्ट मास्टर किंवा पीएचडी झालेले आहेत. त्यांना स्पर्धेत परीक्षक म्हणून काम करायची इच्छा आहे अशांना संधी मिळावी ही अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी विजय पाटकर, सिद्धेश्वर झाडबुके, सविता मालपेकर, विनोद खेडकर, प्रिया बर्डे, प्रियदर्शन जाधव, वैशाली माडे, बाबासाहेब सौदागर, डॉ.सुधीर निकम, संतोष साखरे, संभाजी तांगडे, सुरेखा कुडची, असित रेडीज, मेघा घाडगे, मंगेश मोरे, गिरीश परदेशी, बाळकृष्ण शिंदे आदी उपस्थित होते.