जळगाव राजमुद्रा दर्पण । केंद्र सरकाने तयार केलेले तीन कृषी कायदे रद्द करावेत. या मागणीसाठी देशात गेल्या महिन्यांपासून आंदेालन सूरू आहे. सर्वच विरोधी पक्षांनी हे काळे कायदे रद्द करण्याची मागणी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी हे कायदे मागे घेत असल्याची जाहीर केल्याने लोकसंघर्ष मोर्चातर्फे फटाके फोडून व पेढे वाटून या स्वागत करत जल्लोष केला.
शेतकरींचे आंदोलन सुरू होते. अनेकांनी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला पाठींबा दिला होता. तीन कृषी कायदे अन्यायकारक असल्याने ते रद्द करावेत या मागणीसाठी झालेल्या आंदोलनता आतापर्यंत सातशे शेतकऱ्यांना आपला प्राण गमवावा लागला हेाता. अखेर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायदे रद्द केले. याचे स्वागत लोकसंघर्ष मोर्चातर्फे केले. टॉवर चौकात लोकसंघर्ष मोर्चाचे सचिन धांडे, फारूख कादरी, पियूष पाटील आदी उपस्थित होते.
धांडे म्हणाले, की केंद्र सरकारेन तयार केलेले तीन काळे कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. याचे आम्ही स्वागत करतो. हे कायदे मागे घेण्यास त्यांना एक वर्ष लागले. शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सत्याग्रह करावा लागला. हे काळे रद्द करण्यासाठी लोकशाहीत तब्बल एक वर्ष सत्याग्रह करावा लागला ही लोकशाहीची थट्टा असली तरी ‘देर आए दुरूस्त आए’ या म्हणीनूसार या घोषणचे आम्ही स्वागत करतो. काळे कायदे मागे घेण्यासाठीच्या आंदोलना ७०० शेतकऱ्यांनी हूतात्म प्रत्करले आहे. त्या शेतकऱ्यांना प्रत्येकी पन्नास लाखाची नूकसान भरपाई मिळाली पाहिजे.