जळगाव राजमुद्रा दर्पण । देशाचे पंतप्रधान सर्वच पातळयावर अपयशी ठरले असुन सतत वाढणारी महागाई, नोटबंदी, कोरोना काळात घेण्यात आलेले उशीराचे निर्णय इ विविध विषयाबाबत जनतेचा रोख वाढत चालेलेला असल्याने गेल्या एक वर्षापासुन सुरू असलेले कृषी कायदे मागे घेण्यासाठी होत असलेले आंदोलन दडपण्याचा अयशस्वी प्रयत्न शेतकऱ्यांनी हाणुन पाडले. उत्तरप्रदेशात व इतर राज्यातही भाजपची डागाळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी कृषाी कायदे मागे घेण्याचा निर्णय मोदींनी आज रोजी घेतला व तसा निर्णय जाहीर केला अन्यायकारक कृषी कायदे मागे झाल्याबाबत देशातील शेतकऱ्यांचा मोठा विजय झाल्याने आज रोजी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी जिल्हा व महानगर यांच्या वतीने प्रतिनिधीक स्वरुपात घालुन महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रदेश प्रवक्ते योगेश देसले, महिला आघाडी अध्यक्षा मंगला पाटील, प्रतिभा शिरसाठ, सुनील माळी, रमेश बहारे, जितेंन्द बागरे, अमोल कोल्हे, डॉ. रिझवान खाटीक, सुशील शिंदे, विशाल देशमुख, किरण राजपुत, दिप्ती भामरे, अशोक सोनवणे, दिलीप माहेश्वरी, राहुल रोके, नईम खाटीक, जितेंन्द्र चांगरे, अनिरुध्द जाधव, अमोल सोनार, भल्ला तडवी, उज्ज्वल पाटील, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत घोषणा देउन, लाडु वाटप करुण फटाके फोडण्यात आले.