जळगाव राजमुद्रा दर्पण । जळगाव येथे शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान तर्फे नुकतेच भारतीय सैन्यात भरती झालेले व खडतर प्रशिक्षण पुर्ण करुन आलेले जवान हर्षल राजपुत (उर्फ बंटीभाऊ मेजर) यांचे स्वागत समारंभाचा कार्यक्रम दिनांक १९ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7ः00 वाजता शिवतीर्थ (पुण्यश्लोक छत्रपती श्री. शिवाजी महाराज यांचे स्मारक) जळगाव येथे आयोजीत करण्यात आला. सर्व प्रथम छत्रपती श्री शिवरायांना माल्यार्पण करून व ध्येय मंत्र म्हणून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली व जवान हर्षलभाऊ राजपुत यांना भगवी शॉल श्रीफळ व पुष्पमाळ घालुन त्यांचा शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानतर्फे गौरव करण्यात आला.
त्यावेळी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान चे जिल्हा प्रमुख गजानन माळी, दिपक राव, प्रकाश जाधव, अशोक शिंदे, तुषार महाजन, सागर राजपुत, समाधान कोळी, रवि वाणी, स्वप्निल येवले, नरेंद्र दिवेकर, जितेंद्र कोळी, जितेंद्र राजपुत किशोर पाटिल सर्व मित्र परीवार व युवा सहकारी शिवतीर्थ जळगाव येथे उपस्थित होते. तसेच प्रेरणा मंत्र म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली व त्या भारत मातेच्या सुपुत्रास शुभेच्छा देण्यात आल्या.