जळगाव राजमुद्रा दर्पण । कोरोना काळात ५८ हजार रुपयांच्या घरात गेलेले सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. जळगावमध्ये सोन्याचे दर तब्बल दीड हजार रुपयांपेक्षा अधिकने कमी झालेत. सराफ बाजारात शनिवारी १० ग्रॅम सोन्याचा भाव ५०,२१० रुपये इतका आहे. तर चांदी प्रति किलो ६७,५२० रुपये इतक्यावर आहे.
जून २०२१ महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सोन्याच्या दरात तब्बल दीड हजार रुपयांपेक्षा अधिक घसरण नोंदवली गेली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे दर भडकले आहेत. दुसरीकडे, सुरक्षित परतावा मिळावा म्हणून गुंतवणूकदारांकडून सोन्याऐवजी अन्य पर्यायांना प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे सोन्याची मागणी घटली आहे.
१५ नोव्हेंबर (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ५०,४७० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६८,७२० रुपये असा होता.१६ नोव्हेंबर (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ५०,४५० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६८,१२० रुपये असा होता. १७ नोव्हेंबर (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ५०,१९० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६७,७९० रुपये असा होता. १८ नोव्हेंबर (गुरुवार) दिवाळीच्या दिवशी २४ कॅरेट सोन्याचे दर ५०,४५० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६८,१९० रुपये असा होता. १९ नोव्हेंबर (गुरुवार) दिवाळीच्या दिवशी २४ कॅरेट सोन्याचे दर ५०,२१० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६७,५२० रुपये असा होता.