नाशिक राजमुद्रा दर्पण। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या आयुष्यात सूख आणि समृद्धी आणणारे तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाईलाजाने आणि दुःखाने घेतला. पण त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होणार आहे, अशी खंत व्यक्त केलीय. पाटील यांच्या वक्तव्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केलीय.
माझ्या शोक संदेश चंद्रकांत पाटील यांना पाठवेल. त्यांच्यासाठी हा शोक असेल तर त्यासाठी आपण शोकसभा घेऊ. देश उत्सव साजरा करत असेल तेव्हा जर कुणाला शोक वाटत असेल तर त्यांची मानसिकता तपासावी लागेल.
संजय राऊत यांनी कृषी कायद्यावरुन भाजपवर जोरदार टीका केलीय. दीड वर्षांपासून शेतकरी तणाव, दबावात होता. त्या जोखडातून तो बाहेर निघाला आहे. विक्रम गोखले, कंना रनौत यांच्या स्वातंत्र्याची व्याख्या वेगळी असेल. शेतकऱ्यांना मालक नव्हे गुलाम करण्याचा हा कायदा होता. शेतकऱ्यांच्या जमिनीवर कब्जा करणारा हा कायदा होता. गाड्या घातल्या, गुंड पाठवले. मात्र, शेतकरी हटला नाही. हे स्वातंत्र्य आहे. हे लढवून मिळालं आहे, भीकेतून नाही. जालियनवाला बागेत ईस्ट इंडिया कंपनीने गोळ्या घातल्या. तसंच शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालून चिरडल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केले.