औरंगाबाद राजमुद्रा दर्पण। पोलीस आयुक्तालयातील शिपाई पदासाठीच्या भरती प्रक्रियेसाठी काल औरंगाबादत्या केंद्रावरही परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यातील करमाड येथील न्यू हायस्कूल केंद्रावरील एका उमेदवाराने अत्यंत हायटेक पद्धतीने कॉपी केल्याचे उघडकीस आले. करमाड येथील न्यू हायस्कूल केंद्रात एका उमेदवाराने कानात अगदी खोल ज्वारीच्या दाण्याएवडे ब्लूटू बसवून मास्कमध्ये चिप लपवली होती. तपासणीत पोलिसांनी त्याला मास्क काढायला लावला. मास्कमध्ये चिप असल्याचे पाहून पोलिसही थक्क झाले.
करण त्र्यंबक सुंदरडे या विद्यार्थ्याच्या जागेवर परीक्षा देणारा हा उमेदवार आकाश जारवाल असल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघड झाले. पोलिसांनी मास्क काढायाला सांगितल्यावर मास्कमध्ये चिप तर कानात ब्लूटूथ लावल्याचे दिसून आले. करण आकाशविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. कानातने ब्लूटूथ मात्र निघाले नाही. करमाड येथील एका डॉक्टरकडे नेऊन त्याच्या कानातील ब्लूटूथ काढावे लागले, अशी माहिती पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिली.