औरंगाबाद राजमुद्रा दर्पण। करियर कट्टा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रगतीसाठी तयार केलेले दालन आहे. यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा व करिअर कट्ट्याचा आपला सर्वांगीण विकासासाठी उपयोग करून घ्यावा. करियर कट्टा या उपक्रमातून आयएएस, युपीएससी, एमपीएससी, सायबर सेक्युरिटी, ई-फायलिंग स्पर्धा परीक्षा याची योग्य व आवश्यक मार्गदर्शन केले जाईल.
स्पर्धेच्या व जागतिकीकरणाच्या युगामध्ये जो कोणी स्वतःला कळविण्यासाठी सक्षम असेल. त्यातच विकास होईल त्यासाठी करियर खट्टा सारख्या उपक्रमातून गरजू गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञानावर आधारित कौशल्य प्राप्त करून, तो स्वतःच्या पायावर उभा राहील व तो पुढे चालून उद्योजक व स्वावलंबी बनला पाहिजे. असे मत उच्च व तंत्रशिक्षण कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.” औरंगाबादेतील देवगिरी महाविद्यालयात करिअर कट्ट्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
त्यातून विद्यार्थी हाच घटक उच्च पदस्त होऊ शकतो. हा उपक्रम विद्यार्थी भूमिका असल्यामुळे त्याचा पुरेपूर फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे याचे मला मनस्वी आनंद आहे. सर्वांनी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर खबरदारी घ्यावी. तसेच लसीकरणास प्रोत्साहित करावे व मोठ्या संख्येने विद्यार्थी लसीकरण करून घेतील याकडे लक्ष द्यावे. असे देखील सामंत म्हणाले. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र व देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत औरंगाबाद विभागातील प्राचार्य जिल्हानिहाय व महाविद्यालयीन समन्वयक यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.