नवी दिल्ली राजमुद्रा दर्पण । बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. कच्च्या तेलाचे भाव कमी होऊन 78.51 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. दरम्यान यापूर्वी शनिवारी देखील दरामध्ये तीन टक्क्यांची घसरण पहायाला मिळाली होती. आज पुन्हा एकदा दर 0.48 टक्क्यांनी कमी झाले आहेत. कोरोनाचे सावट कमी झाल्याने जगतीक स्थरावर कच्च्या तेलाचे उत्पादन वाढले आहे. याचा परिणाम म्हणेज तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. कच्च्या तेलाचे दर घटल्याने येणाऱ्या काळात भारतामध्ये पेट्रोल, डिझेल स्वस्त होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
कच्च्या तेलाचे दर वाढले की पेट्रोल, डिझेलचे दर देखील वाढतात आणि दर कमी झाले तर इंधनाचे दर देखील कमी होतात. कच्चा तेलाच्या किमतीमध्ये तीन टक्क्यांची घट होऊन देखील भारतात पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर आहेत. दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर 103.97 रुपये आणि डिझेलचा दर 86.67 रुपये इतका आहे. तर मुंबईत अनुक्रमे पेट्रोल आणि डिझेलचा दर 109.98 आणि 94.14 रुपये प्रति लिटर आहे.