जळगाव राजमुद्रा दर्पण । बालन्याय अधिनियम २०१५ च्या कलम ४४ आणि ४५ तसेच नियम २०१८ मधील २५ नुसार प्रतिपालकत्व, २६ नुसार प्रायोजकत्व या योजनेबाबत तरतूद केली आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर प्रतिपालकत्व, प्रायोजकत्व तसेच अनुरक्षणगृह या संस्थेत्तर सेवांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने पुणे आयुक्त यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकार्यांच्या मान्यतेने नुकतीच समिती गठीत केली आहे. त्यात अध्यक्ष, तीन सदस्य, दोन अशासकीय सदस्य तसेच सदस्य सचिवाचा समावेश आहे.
समितीत मौलाना आझाद अल्पसंख्याक समाज विकास फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोज रफिक शेख यांची अशासकीय सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. दोघांची सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेवून त्यांची निवड केली आहे. दोघांना जिल्हा बाल संरक्षण समिती तथा जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीचे नियुक्ती पत्रही प्राप्त झाले आहे. या निवडीबद्दल दोघांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.