जळगाव राजमुद्रा दर्पण । जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महविकास आघाडी प्रणित सहकार पॅनलचे उमेदवार डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर, अँड. रोहिणी खडसे विजयी झाल्या आहेत. खडसे यांनी पुन्हा एकदा आपली ताकत दाखवून दिली आहे.
माजी मंत्री गुलाबराव देवकर विजयी झाले. त्यांना १५०१ मते मिळाली, इतर मागासवर्ग मतदार संघात सहकार पॅनलचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील विजयी झाले. त्यांना २३१६ मते मिळाली. त्यांचे विरोधी विकास पवार यांना २४२मते मिळाली, अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून सहकार पॅनल चे श्यामकांत सोनवणे विजयी झाले आहेत. त्यांना २४६४ मते मिळाली. आत्तापर्यंत एक अपक्ष उमेदवार (भाजप) आमदार संजय सावकारे निवडून आले आहेत. दरम्यान प्रतिस्पर्धी उमेदवारास पाठींबा दिललेल्या जनाबाई महाजन या एका मताने विजयी झाल्या आहे.
रावेर विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघात सहकार पॅनल मधील उमेदवार जनाबाई गोंड महाजन यांनी जाहीर माघार घेऊन अपक्ष उमेदवार माजी आमदार अरुण पाटील यांना पाठिंबा दिला होता. मात्र उलटफेर होवून माघार घेतलेल्या सहकार पॅनल मधील जनाबाई महाजन या एका मताने विजयी झाल्या. त्यांना 26 मते मिळाली तर अरुण पांडुरंग पाटील यांना 25 मते मिळाली.