मुंबई राजमुद्रा दर्पण। भूषण प्रधान आणि प्रार्थना बेहरे अभिनित ‘अजिंक्य’ या चित्रपटाचे सोशल मीडिया आणि चित्रपट विश्लेषकांकडून कौतुक होताना दिसत आहे. चित्रपट निर्माते अरुणकांत शुक्ला, नीरज आनंद, राघवेंद्र के. बाजपेयी, बाबालाल शेख, राहुल लोंढे, आणि वेद. पी शर्मा यांनी ‘अजिंक्य’ या चित्रपटात शेतकऱ्यांच्या व्यथा आणि त्यावर तोडगा काढणारा तरुण याची कथा दर्शविण्यात आल्या कारणाने, त्यांनी हा चित्रपट संपूर्णपणे भारतीय शेतकऱ्यांना समर्पित करत आहोत असे म्हटले आहे. शेतकरी चळवळीसाठी समर्पित होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरू शकेल.
शेतकऱ्यांना होणाऱ्या फायद्याच्या सर्वात मोठ्या बाबींवर भाष्य करणाऱ्या ‘अजिंक्य’ची आणि सध्या देशात या विषयी सुरू असणाऱ्या घडामोडी याच कारणामुळे सोशल मीडियावर देखील या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे.
कालपासून ट्विटरवर देखील मोदी इज अजिंक्य टुडे (#ModiisAjinkyatoday) हा हॅशटॅग ट्रेंड होत असून लोकांमार्फत ‘अजिंक्य’ या चित्रपटाबद्दल खूप बोललं जात आहे. चित्रपटाचे निर्माते हे जरी अमराठी असले, तरी त्यांना भारतीय शेतकरी आणि त्यांच्या व्यथा ते जवळून जाणतात आणि म्हणूनच दिग्दर्शक अ. कदिर यांच्या उत्कृष्ट संकल्पनेला त्यांनी होकार देत, या चित्रपटासाठी आर्थिक सहकार्य उभे करण्याचे धाडस केले. चित्रपटाचे मुख्य कलाकार म्हणजेच ‘अजिंक्य’ आणि ‘रितिका’च्या भूमिकेत असलेले अभिनेता भूषण प्रधान आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांनादेखील याच संकल्पनेमुळे चित्रपटात काम करण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली.