मुंबई राजमुद्रा दर्पण। परमबीर सिंह यांनी पदावर असताना भ्रष्टाचाराच्या आरोपासाठी ज्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली. त्यांनाच तक्रारदार केले जात असल्याचे त्यांच्या वकिलाने म्हटले. परमबीर सिंह हे 48 तासांमध्ये कोणतेही सीबीआय अधिकारी अथवा कोर्टासमोर हजर राहण्याची त्यांची तयारी असल्याची माहिती त्यांच्या वकिलाने दिली. सुप्रीम कोर्टाने परमबीर सिंह यांनी चौकशीत सहकार्य करण्याचे निर्देश देत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. या पुढील सुनावणी सहा डिसेंबर रोजी होणार आहे
परमबीर सिंह हे भारतातच असून, मुंबईत त्यांच्या जीवाला धोका असल्याने ते महाराष्ट्राबाहेर असल्याची माहिती परमबीर यांच्या वकिलांनी आज सर्वोच्च न्यायालयात दिली. यावर न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले आहे. सुनावणी अंती न्यायालयाने परमबीर सिंह यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे.
परमबीर सिंह यांनी अटकेपासून संरक्षण मिळावे, याकरीता सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. त्यावर न्यायालयाने त्यांच्याबद्दल माहिती विचारली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी त्यांच्या वकिलांनी परमबीर सिंह नेपाळमार्गे देशाबाहेर गेल्याची माहिती चुकीची असल्याचे म्हटले आहे. “माझ्याजवळ डीजीपींची ऑडिओ टेप आहे, ज्यामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेली तक्रार मागे घेण्यास सांगितले जात आहे. ते मला धमकी सुद्धा देत आहेत. तक्रार आणि खटले मागे घेतले नाही, तर माझ्यावर अनेक गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात आहे”, असे परमबीर सिंह यांच्या वकिलांनी आज न्यायालयात सांगितले आहे.