लातूर राजमुद्रा दर्पण । राज्यात सध्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांच्या निकालाची जोरदार चर्चा सुरु आहे. लातूर जिल्हा बँकेत काँग्रेसच्या सहकार पॅनेलनं 18 जागांवर विजय मिळवला आहे. भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणूकीत काँग्रेसच्या सहकार पॅनेलला बहुमत मिळाले आहे. 19 पैकी काँग्रेसचे 18 उमेदवार निवडून आले आहेत, तर भाजपाप्रणीत लोकशाही पॅनेलचा एक उमेदवार निवडून आला आहे.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस प्रणीत सहकार पॅनेलचे 18 उमेदवार विजयी झालेले आहेत. काँग्रेस प्रणीत सहकार पॅनेलच्या विजयानंतर उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष केला आहे. धीरज देशमुख यांनी मतदारांनी आम्हाला कौल दिलेला आहे. जिल्हा बँकेनं गेल्या तीन दशकांपासून चांगल्या प्रकारे काम केलं आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कामाचा विस्तार करणार असल्याचं धीरज देशमुख म्हणाले. लातूर जिल्हा बँकेचा लौकिक राज्यात आणि देशात आहे. जिल्हा बँकेची यशस्वी परंपरा पुढील काळात जपणार असल्याचं धीरज देशमुख यांनी म्हटलं आहे.