मुंबई राजमुद्रा दर्पण। बॉलिवूडचा अभिनेता अमीर खानने दोन महिन्यांपूर्वी पत्नी किरण रावसोबतचे 15 वर्षांचे लग्न मोडले .त्यांनी सोशल मीडियावर घटस्फोटाची घोषणा केली होती . एक व्हिडिओ शेअर करून , अमीर खान सांगितले होते की , आम्ही दोघेही आता पती पत्नी राहणार नाही . पण मुलगा ओझाद याला एकत्र वाढवणार आहोत . दोघेही त्यांच्या मुलासोबत वेळ घालवत आहेत . आमिर जवळपास एक वर्षापासून वेगळा राहत आहे . त्याचवेळी सोशल मीडियावर काही छायाचित्रे समोर आली आहेत. दरम्यान, अमिर तिसऱ्यांदा लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे. येणारा चित्रपट लाल सिंग चढ्ढा रिलीझ झाल्यानंतर अमिर आपल्या तिसऱ्या लग्नाची घोषणा करणार आहे अशी चर्चा अमोर आली आहे.
त्यानंतर आता आमिर तिसरं लग्न कोणाशी करणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. अमीर खान हा गेल्या अनेक दिवसांपासून फातिमा सना शेखसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र, दोघांनीही यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे आता आमिर खान तिसरं लग्न कोणाशी करणार याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.