मुंबई राजमुद्रा दर्पण। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराला मोठा झटका बसला होता. सेंसक्समध्ये झालेल्या तीव्र घसरणीमुळे गुंतवणुकदारांचे तब्बल 8,21,666.7 कोटी रुपयांचे नुकसान झाले. आज सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार कोसळला. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम शेअर मार्केटवर होताना दिसत आहे.
दिवसाच्या पहिल्याच सत्रात सेन्सेक्स तब्बल 482 अकांनी घसरला. त्यानंतर ही घसरण कायम राहीली असून, सध्या स्थितीत सेन्सेक्समध्ये 748 अकांची घट झाली असून, तो 57,983.95 वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे निफ्टी देखील 17300 अंकांपेक्षा खाली आली आहे. त्यानंतर चौथ्या सत्रात त्यामध्ये थोड्याप्रमाणात सुधारणा झाली, मात्र घसरण कायम राहिली. आज शेअर मार्केट सुरू होताच सेन्सेक्स 482 अकांनी कोसळला ही घसरण अजूनही सुरूच असून, सध्या सेन्सेक्स 748 अंकाच्या घसरणीसह 57,983.95 अंकांवर पोहोचला आहे. आज देखील गुंतवणुकदारांचे मोठे नुकसान झाले आहे.