जळगाव राजमुद्रा दर्पण। सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरूच असतात. सोन्याचे भाव वाढले असून चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. लग्नाचा काळ असतांना सोन्याच्या भावात वाढ झाली आहे.
धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज 46,940 रुपये आहे. मागील काही दिवसात २२ कॅरेट सोन्याची किंमत 46,500 रुपये प्रति १० ग्रॅमवर झाली होती. तर २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत 49,290 प्रति १० ग्रॅम आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६४६ रुपये आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत वर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,200 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती. म्हणजेच ते अजूनही रेकॉर्ड स्तरापेक्षा सुमारे 8200 रुपयांनी स्वस्त आहे.
सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता.