मुंबई राजमुद्रा दर्पण। महाविकास आघाडी सरकारला इम्पेरिकल डेटाची व्याख्या तरी माहिती आहे का? त्यांना ओबीसींचे आरक्षण असुरक्षित करायचे आहे. असे म्हणत पंकजा मुंडेनी आज पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे जनतेच्या हिताचे नसून, ते काहीही करत नाही. कोणतीही गोष्ट असली की ते केंद्राकडे बोट दाखवतात. कोणतेही कारण असू द्या ते केंद्रावर टीका करत असतात.
केंद्राकडे बोट दाखवून राज्य सरकार आपली जबाबदारी झटकण्याचे प्रयत्न करत आहे. राज्यात परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतीचे मोठ्य़ा प्रमाणात नुकसान झाले. त्यांना मदत करण्याचे राज्य सरकारचे कर्तव्य होते. आता शेतकरी संकटात असताना त्यांच्याकडून वीजबिल वसुली का केली जात आहे? असा सवाल देखील पंकजा मुंडेंनी उपस्थित केला आहे. अतिवृष्टी दरम्यान सर्वात आधी भाजप नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. असे देखील पंकजा म्हणाल्या.हे सरकार जनेतच्या हितासाठी कोणतेही पाऊल उचलतांना दिसत नाही. ओबीसींचे आरक्षण देखील यांच्यामुळेच टीकले नाही. असा हल्लाबोल पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.