धुळे राजमुद्रा दर्पण । गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे, पण आंदोलन करून देखील त्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. आणि त्यांना बस सुरु करण्याची नोटीस कर्मचाऱ्यांना आली, त्याप्रमाणे धुळे येथे बस सुरु करावी अशी बातमी आल्याने दोन आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना हृदयविकाराचे झटके आले. यात एकाचा मृत्यू झालेला आहे.
धुळे व जळगाव या ठिकाणी आंदोलनाला बसलेले दोन एसटी कर्मचाऱ्यांना हृदयविकाराचे झटके आले आल्याची घटना उघडकीस आली. त्यात धुळ्यातील 40 वर्षीय चालक एसटी आंदोलकास हृदयविकाराचा झटका आला असून आंदोलकाला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर पाचोरा आगारातील दिलीप महाजन यांचा धुळ्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.