पुणे राजमुद्रा दर्पण। एअरटेलने आपल्या प्रीपेड प्लॅन्सच्या दरांमध्ये वाढ केल्याच्या दुसऱ्याच दिवशी व्होडाफोन आयडियाने दरवाढीची सांगितले. व्होडाफोन आयडिया आता आपल्या ग्राहकांना प्रीपेड प्लॅन्ससाठी 20 ते 25 टक्के जास्त दर आकारणार आहे.
कंपनीने घोषित केलेले नवीन दर 25 नोव्हेंबर 2021 पासून लागू होणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून व्होडाफोन-आयडिया आर्थिक नुकसानीचा सामना करत आहे. अशात नवीन दरांमुळे कंपनीच्या सरासरी महसूलात सुधारणा होईल असे कंपनीने सांगितले आहे.
विशेष म्हणजे, एअरटेलने सुद्धा आपल्या ग्राहकांकडून प्रीपेड प्लॅनसाठी 25 टक्के अधिक दर आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
भारती एअरटेलने किंमती वाढवल्याचे कारण देत सांगितले की, चांगल्या आणि हेल्थी बिझनेस मॉडेलसाठी दर वाढवणे आवश्यक आहे. कंपनीने पुढे म्हटले की, प्रति वक्ती सरासरी महसूल 200 रुपये असावा आणि नंतर तो 300 रुपयांपर्यंत वाढवावा.