जळगाव राजमुद्रा दर्पण | महापौर जयश्री महाजन यांना आगामी काळात शिवसेनेच्या विधानसभेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली गेली आहे. याबाबत अनेक तर्क-वितर्क देखील लढवले जात आहे. जळगाव महापालिकेत सत्तांतर यानंतर झालेले फेरबदल यामध्ये महापौरपदी जयश्री महाजन यांना संधी देण्यात आली. यासाठी त्यांचे पती विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी अधिक राजकीय कष्ट घेतल्याचे दिसून आले. आता देखील जिल्हा बँकेत सहकार क्षेत्रात पाय रोवताना प्रथमच उमेदवारी केली मात्र यामध्ये बिनविरोध निवड झाल्याने थेट राजकीय जाणकारांचे लक्ष महापौर जयश्री महाजन यांनी वेधून घेतले आहे. विद्यमान आमदार असलेले राजू मामा भोळे यांचे नामनिर्देशन पत्र अवैध ठरवल्यामुळे महापौर महाजन यांचा विजय सोपा झाला होता.
यामुळे जळगाव शहराचा राजकीय पटलावर आगामी काळात महापौर जयश्री महाजन यांच्या राजकीय प्रवासाबाबत अनेक विषयाची चर्चा सुरू आहे. महापालिकेतील भाजपच्या बहुमताच्या आकड्याला छेदून अल्पमतात असलेल्या शिवसेनेच्या त्या महापौर झाल्या, सहकार क्षेत्रात नवख्या असताना थेट विद्यमान आमदाराच्या विरोधात बिनविरोध म्हणून बाजी मारली यामध्ये आणखी आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मर्जीतील उमेदवार म्हणून त्यांची विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी वर वर्णी लागू शकते असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
महापालिकेचे विरोधीपक्ष नेते सुनील महाजन हे त्यांचे पती आहेत, शहरातील मेहरून,तांबापूर भागातून ते सतत मनपा नगरसेवक पदी निवडून येत आहे. माजी मंत्री सुरेश दादा जैन यांचे ते विश्वासू मानले जातात मात्र सध्या माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अधिक जवळ गेल्याचे सांगितले जाते. माजी मंत्री खडसे व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा बँकेत जयश्री महाजन यांना संधी चालून आल्याचे स्पष्ट आहे. यासाठी सुनील महाजन यांनी अधिक परिश्रम घेतले जिल्हा बँकेतील राजकीय परिस्थितीचा फार काही अनुभव नसताना जयश्री महाजन यांची उमेदवारी मिळून त्यांना विजयी देखील केले हे विशेष..
महापौर जयश्री महाजन यांनी थेट बिनविरोध निवड झाली असताना देखील जळगाव शहरातील लेवा सभागृहात मानव विकास आघाडीच्या सहकार पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य सभेचे आयोजन केले होते. ही सभा राजकीयदृष्ट्या अधिक चर्चेत आल्याचे पाहायला मिळाले होते, महापौर जयश्री महाजन यांनी आपल्या भाषणात जिल्ह्यातील सर्वच महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मनावर मोहोर घातली शेतकऱ्यांचे आणि कपबशी केलेले त्यांनी विवरण सर्वच नेत्यांना भावले यामुळे खुद्द माजी मंत्री खडसे यांनी महापौरांच्या शिक्षण व वतृत्वा बद्दल कौतुक केले. माजी मंत्री खडसे हे महा विकास आघाडीचे जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक मानले जातात त्यांनीच महापौरांचे कौतुक केले नंतर खडसेंच्या मर्जीतील विधानसभेचे उमेदवार अशी चर्चा महापौरांबाबत सुरू झाली. यासोबत माजी पालकमंत्री सतीश पाटील,कॉग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार,गुलाबराव देवकर,संजय पवार यांनी महापौरांचे अतिशय परखड भाषण प्रथमच आयकल्याचे सांगितले. यामुळे महापौरांचे आगामी राजकारणातील पारडे अधिक वजनदार झाल्याचे समोर आले आहे.