जळगाव राजमुद्रा दर्पण । कोथळी ग्रामपंचायतीत आपला सरपंच, मुक्ताईनगराचा नगराध्यक्ष हा खडसेंचा आहे का? हे तपासून बघा. ताकद बघायची असेल तर जनतेत यावे; कारण अजून जिल्हा परिषदेचे घोडामैदान पुढे आहे; तेथे आमची ताकद दाखवितो. एकनाथ खडसे यांनी आपला विधानसभा मतदारसंघ सांभाळावा. अशा माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी खडसें आव्हान दिले.
जिल्हा बँक निवडणुकीच्या विषयासंदर्भात खडसेंनी या निवडणुकीपासून भाजपने पळ काढला असा आरोप केला. त्या आरोपांवर गिरीश महाजन यांनी खडसेंवर घणाघाती टीका केली. महाजन म्हणाले, की भाजप हा घाबरणारा पक्ष नाही; खडसेंनी आपली ग्रामपंचायत तरी ताब्यात आहे का? हे तपासावे असे गिरीश महाजन म्हणाले.