जळगाव राजमुद्रा दर्पण । जळगाव येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस यांच्या सहकार पॅनेलने बहुमताने विजय मिळविला आहे. राज्यभरात भाजपचे गिरीष महाजन यांची नाचक्की झाल्याने महानगरपालिका सत्तांतर प्रकरणानंतर उरली सुरली अब्रूही गेली. असल्याचा टीका राष्ट्रवादी कॉग्रेसने केली आहे. राष्ट्रवादी महानगर चे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी हे पत्रक काढले आहे.
या पत्रकात पुढे असे की,सर्व जागांवर भाजपतर्फे खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, माजी आमदार, माजी पालकमंत्री, विविध प्रदेश व जिल्हा पदाधिकारी असे सक्षम उमेदवार देण्यात आले. ही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि पराभव टाळता यावा, यासाठी गिरीष महाजन नाथाभाऊंच्या मागे फिरत होते. नाथाभाऊंच्या ताब्यात मुक्ताईनगर नगरपालिका व कोथळी ग्रामपंचायत नसल्याचे सांगत गिरीष महाजन वलग्ना करत आहेत. नाथभाऊंनी मुक्ताईनगर नगरपालिका स्वतःच्या बळावर बहुमताने निवडून विजय मिळवला. लोकनियुक्त नगराध्यक्षा अपात्र झाल्याने मुक्ताईनगर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा मनीषा प्रवीण पाटिल व कोथळी ग्रामपंचायतीचे सरपंच नारायणदादा चौधरी हे नाथाभाऊंच्या सक्षम नेतृत्वाखाली काम करीत आहेत. ज्या जिल्हा परिषद बाबत गिरीष महाजन बोलत आहेत , ती परिषद सुध्दा नाथाभाऊंच्या जीवावर आजपर्यंत ताब्यात आहे.
नाथभाऊंनी जळगाव शहर महानगरपालिकेत भाजपची सत्ता ज्या प्रकारे उलथवून लावली. भाजपचे संख्याबळ ५७ हुन २७ वर आणले व महाराष्ट्रात गिरीष महाजनांची उरली सुरली ईज्जत घालविली. त्या पेक्षाही येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती व दुध विकास फेडरेशन अशा सर्वच ठिकाणी गिरीष महाजन यांचा पराभव करून त्यांना त्यांची औकात दाखवून देऊ अशी खळबळजनक टीका राष्ट्रवादी महानगर ने केल्याने अळी-तळी च्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. जे जिल्हा बँक निवडणुकीत तालुक्यातील निवडणूक लढवू शकले नाही, ते ईतर निवडणुक लढवू शकतील का? असा प्रश्न सर्वानाच पडला आहे. ” भागो भागो ” अशी गत सध्या भाजपची सर्वच निवडणुकीतून झाली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत देखील भाजपला भागो… भागो.. केल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस व आमचे सक्षम नेते नाथाभाऊ राहणार नाही असा ठाम विश्वास आमचा नाथाभाऊंवर आहे. असे पत्रक राष्ट्रवादी काँग्रेस महानगर जळगावतर्फे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, सुनील माळी, अमोल कोल्हे, किरण राजपूत, विशाल देशमुख, सुशील शिंदे, डॉ. रिजवान खाटिक, सुहास चौधरी, अकिल पटेल, नईम खाटिक, राहुल टोके, अनिल पवार आदि पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिले आहे .