जळगाव राजमुद्रा दर्पण । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासमोर दणदणीत विजय मिळवला आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपावर टीका करताना म्हटल आहे की, गिरीश महाजन यांना निवडणूक लढवण्याची हिंमत नव्हती. या निवडणुकीत भाजप कडे दिग्गज उमेदवार होते, मात्र त्यांना आपला पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने त्यांनी या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची भूमिका घेऊन पळ काढला आहे. आता जिल्हा बँकेवर ताबा मिळालाय, भविष्यात नगरपालिका आणि जिल्हा परिषदही काबीज करू, असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला.
जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळाला आहे. 21 जागांपैकी 11 जागा राष्ट्रवादी काँग्रेस, 7 जागांवर शिवसेना, 2 जागांवर काँग्रेस आणि एका जागेवर भाजप उमेदवार विजयी झालाय. तर एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडे यांचाही एकतर्फी विजय झाला आहे.
या विजयाबद्दल एकनाथ खडसे यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे, मागील सहा वर्षांपूर्वी जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक क वर्गात होती. आता ती अ वर्गात आली. बँकेचा संचित तोटा आम्ही कमी केला. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न आम्ही केला. गिरीश महाजन यांच्यात निवडणूक लढवण्याची हिंमत नव्हती. म्हणून त्यांनी पळ काढला. आपल्याला अपयश येईल, याची जाणीव त्यांना झाली होती, म्हणून त्यांनी पळ काढला असावा असे एकनाथ खडसे म्हटले आहे.
एकनाथ खडसे हे पूर्वीचे भाजपचे ज्येष्ठ नेते असल्याने यांनी त्यांच्या मनातील खंत यावेळी व्यक्त केली आहे. मागील 40 वर्षे मी भाजप रुजवण्याचा प्रयत्न केला. मात्र चाळीस वर्ष माझी अवहेलनाच केली गेली. आता मात्र जिल्हा बँकेवर विजय मिळवून दाखला. भविष्यात नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतदेखील विजय मिळवणार असल्याचा आत्मविश्वास एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला.