जळगाव राजमुद्रा दर्पण । राज्य नाट्य स्पर्धेतील प्रवेशिका भरण्याची अंतिम मुदत वाढवावी तसेच जास्तीत जास्त संघाचा सहभाग वाढेल याकरिता स्पर्धा सुरू होण्याची तारीख सुद्धा वाढवावी अशी मागणी नाट्यकलावंतातर्फे करण्यात आली होती. राज्यातील नाट्यकर्मींची मागणी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोळे यांच्या सुचनेचा आदर करून नाट्यस्पर्धा प्रवेशिका भरण्याच्या मुदतीत वाढ करून दिलेली आहे.
नाट्याची मांदियाळी म्हणजेच महाराष्ट्र हौशी राज्य नाट्य स्पर्धा असते. तो आनंद आपल्या या निर्णयाने सर्व नाट्यकलावंत व प्रेक्षकांना मिळणार आहे. या स्पर्धेची प्रवेशिका भरण्याची मुदत ३० नोव्हेंबर २०२१ अंतिम होती ती १५ डिसेंबर करण्यात आली आहे. तसेच स्पर्धा होण्याची तारीख १ जानेवारी २०२२ अशी होती ती १५ जानेवारी २०२२ करण्यात आली आहे. तरी सर्व नाट्यकलावंतानी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे अमित देशमुख यांनी सांगितले.